ईएलएसएस’द्वारे करबचत

ईएलएसएस किंवा करबचत योजना म्हणजे काय? एका गुंतवणूकदाराला त्यात किती गुंतवणूक करता येते?

करबचत करण्यासाठी फत्तम पर्याय म्हणून इक्विटी संलग्न बचत योजना (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्किम किंवा ईएलएसएस) ओळखली जाते. हे फंड इक्विटी किंवा समभागांमध्ये गुंतवणूक करतात. यासाठी गुंतवणूकदाराला लाभांश किंवा वृद्धी यापैकी पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य असते. ईएलएसएसमध्ये कर वाचवण्यासाठी तुम्ही दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. समभागांमध्ये पैसे गुंतवले जात असल्यामुळे दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीत चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवता येते. अर्थात सर्व म्युच्युअल फंड योजनांप्रमाणेच निश्चित उत्पन्नाची येथेही कोणतीही हमी नाही.

ईएलएसएस योजनेत कशी गुंतवणूक करावी?
एकदा गुंतवणूकदाराची केवायसी पूर्तता झाल्यावर कोणत्याही अन्य म्युच्युअल फंडाप्रमाणेच ईएलएसएसमध्ये पैसे गुंतवता येतात. योग्य तो अर्ज भरून किंवा धनादेशाने ही गुंतवणूक करता येते. ही गुंतवणूक फंडाच्या वेबसाइटवर जाऊन किंवा ऑनलाइन पोर्टलच्या साह्याने करता येते. या गुंतवणुकीसाठी एसआयपी किंवा एसटीपी पद्धत वापरता येते.


 कलम ८०सी अंतर्गत अन्य करबचत योजनांमध्ये मिळतो तसा फायदा ईएलएसएसमध्ये मिळतो का?
अन्य करबचत योजनांच्या तुलनेत ईएलएसएसचा लॉकइन कालावधी सर्वात कमी, तीन वर्षांचा असतो. पीपीएफसाठी हा लॉक इन कालावधी १५ वर्षांचा असतो. पीपीएफमधून गरज भासल्यासच पैसे काढता येतात. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीमध्ये (ईपीएफ) तुमची नोकरी सुरू असेपर्यंत तुमचा पैसा अडकून राहतो. अन्य करबचत उत्पादनांसाठी पाच वर्षांचा लॉक इन कालावधी असतो. राष्ट्रीय पेन्शन योजनेत हा पैसा गुंतवणूकदाराच्या ६० वर्षे वयापर्यंत वापरता येत नाही. ईएलएसएसमध्ये लाभांश पर्याय निवडल्यास तुम्हाला योजना कालावधीच्या मध्येच उत्पन्न सुरू होते. ईएलएसएस योजनेत लाभांशावर तुम्हाला कर भरावा लागत नाही किंवा पैसे मध्येच काढताना त्यावरही कर भरावा लागत नाही.

- लॉक इन कालावधी संपल्यावर गुंतवणूकदाराच्या हातात कोणते पर्याय ईएलएसएसमध्ये उरतात?
तीन वर्षांच्या लॉक इन कालावधीनंतर म्युच्युअल फंडांतील युनिट्स त्या योजनेतच ठेवण्याचा पर्याय गुंतवणूकदारांसमोर उरतो. इक्विटी वाटपासाठी ईएलएसएसचा पर्याय निवडण्याचा सल्ला वित्त नियोजक देतात.

Call :  8237460170

Mutual Fund investments are subject to market risk Please read the offer document carefully before investing